गोंदिया पोलिसांनी आदिवासींच्या दिवाळीत घातली आनंदाची भर.

सशस्त्र दूरक्षेत्र धाबेपवनी च्या वतीने येरंडी व जब्बरखेडा येथे वस्तूंचे आदिवासींना वाटप.

गोंदिया पोलिसांनी आदिवासींच्या दिवाळीत घातली आनंदाची भर.

गोंदिया पोलीस दलाचा स्तुत्य उपक्रम.

 

 

संजीव बडोले
प्रतिनिधी

नवेगावबांध दि. 13 नोव्हेंबर:-जिल्हा पोलीस अधिक्षक गोंदिया विश्व पानसरे यांच्या यंदाची दिवाळी आदिवासींसोबत या संकल्पनेतून गोंदिया जिल्ह्यातील नक्षल बहुल आदिवासी भागात गोंदिया पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी गोंदिया कॅम्प देवरी, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकूल देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली ससस्त्र दूरक्षेत्र धाबे पवनी अंतर्गत मौजा येरंडी दर्ये व जब्बारखेडा येथे दिनांक 13 नोव्हेंबर रोज शुक्रवार ला सशस्त्र दुरक्षेत्र धाबेपवनी च्या वतीने गरीब गरजू आदिवासी नागरिकांना दिवाळीची भेट म्हणून, साडी, धोतर ,ब्लॅंकेट व मुलांना शालेय पुस्तके, स्टेशनरी, बॉल या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नवेगावबांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले ससस्त्र दूरक्षेत्र धाबेपवनी , सरपंच मनीषा शहारे येरंडी, उपसरपंच सानियाताई वाढई,पोलीस पाटील अमर कोडापे, कोल्हटकर ग्रामसेवक, फरदे गुरुजी, संजय खरवडे सरपंच कान्होली,मायावेळी उपस्थित होते. भारतीय संस्कृतीत दिवाळी सर्वात मोठा व महत्त्वाचा सण आहे. गरीब असो वा श्रीमंत असो प्रत्येक व्यक्ती आपल्या मिळकती नुसार सण साजरा करतो. आदिवासी नागरिक आपल्या मिळकती नुसार आपला व आपल्या कुटुंबियांचा मूलभूत गरजा पूर्ण करतो. अधिकतर वेळ त्यांना अर्धनग्न अवस्थेत राहावे लागते. या आदिवासी समाजाला मूलभूत सुविधांची गरज असताना, प्रेमाचा ही आधार असावा लागतो. या बाबीकडे लक्ष देत आदिवासी नागरिक व त्यांच्या मुलांना मदत मिळावी, यासाठी सशस्त्र दूरक्षेत्र धाबेपवनी च्या वतीने, ससस्त्र दूरक्षेत्र पवनीधाबे अंतर्गत मौजा येरंडी दर्ये येथील 124 व जब्बारखेडा गावातील 69 आदिवासी व गरजू कुटुंबांना जवळपास 250 नागरिकांना व त्यांच्या मुलांना वेगवेगळ्या जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात महिलांना साड्या, ब्लॅंकेट चप्पल जुते, लहान मुलांना टी-शर्ट ,नोटबुक, पेन्सिल, कंपास बॉक्स, स्कूल बॅग, मिठाई वाटप यावेळी करण्यात आले. दिवाळी सणानिमित्त नागरिकांच्या मूलभूत व शालेय साहित्याचे भेट देऊन त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये या दिवाळी सणानिमित्त आदिवासींच्या आनंदामध्ये भर घालण्याचा गोंदिया पोलीस दलाकडून यशस्वी प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाला मौजा येरंडी,जब्बारखेडा गावातील सरपंच, पोलीस पाटील, पोलीस ठाणे नवेगावबांध, सशस्त्र दूरक्षेत्र धाबेपवनीचे अंमलदार व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोरोना प्रोटोकालचे मार्गदर्शक तत्वे पाळण्यात आली. सहस्त्र दूरक्षेत्र धाबे पवनीच्या या उपक्रमाचे व गोंदिया पोलीस दलाच्या यंदाची दिवाळी आदिवासींसोबत या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.