श्री. शिलवंत मानकर, श्री. देवानंद खरात, श्री. महेश सोनावणे महा कार्ड चा वापर करून प्रवास करा लकी ड्रॉ चे विजेते
नागपूर २७ ऑक्टोबर: महा मेट्रोने तिकीट दरात ५०% सूट दिली असून प्रवासी या सेवेचा वापर करीत आहे. याच पार्श्वभूमीवर महा मेट्रो द्वारा आयोजित मेट्रोने प्रवास करा व लकी ड्रॉ जिंका आयोजित स्पर्धेचा निकाल आज घोषित करण्यात आला या लकी ड्रॉ चा मुख्य उद्देश जास्तीत जास्ती नागरिकांना मेट्रोशी जोडणे याच औचित्याने लकी ड्रॉ चे आयोजन महा मेट्रोच्या वतीने करण्यात आली आहे आहे. लकी ड्रॉ प्रत्येक आठवड्यात २ उघडला जात असून आज पहिल्या लकी ड्रॉ उघडण्यात आला ज्यामध्ये तिकीट काढून प्रवास करणाऱ्या मध्ये श्री. शंकर आष्टणकर, श्री. चंदन कुमार , श्री. योगेश जाधव याची निवड झाली तिकीट काढून प्रवास करणाऱ्या पहिल्या तीन प्रवाश्याना हा लकी ड्रॉ देण्यात आला.
महा मेट्रोच्या वतीने ऑनलाइन पेमेंट करिता जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यात येत असून महा कार्डचा वापर करणाऱ्या प्रवाश्याना देखील या लकी ड्रॉ मध्ये सहभागी करण्यात आले होते ज्यामध्ये महा कार्ड चा वापर करून प्रवास करणारे श्री. शिलवंत मानकर, श्री. देवानंद खरात, श्री. महेश सोनावणे यांनी हा लकी ड्रॉ जिंकला. जास्तीत जास्ती नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे व सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन महा मेट्रोच्या वतीने करण्यात येत आहे.