चिचगड, नवेगावबांध वनक्षेत्रात पक्षि सप्ताहानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वच्छता अभियान.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.6नोव्हेंबर:-गोंदिया वनविभाग अंतर्गत नवेगावबांध ,चिचगड वनपरिक्षेत्रात पक्षी सप्ताहनिमित्त पक्ष्यांचे आदिवास क्षेत्रात साफसफाई अभियान राबविण्यात आला.पक्ष्यांचे अधिवास टिकून राहावा या साठी वनक्षेत्र समोरील तलाव परिसरातील मानवनिर्मित कचऱ्याचे उच्चाटन करण्यात आले.पक्षी सप्ताहानिमित्त येथील राष्ट्रीय उद्यान, विशेष व्याघ्र संरक्षण दल, स्वागत अधिकारी कार्यालय , प्रादेशिक वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध नवेगावबांध जलाशय परिसरात पक्षी सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी पाच नोव्हेंबरला स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राज्यात पाच नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत वन विभागाच्या वतीने पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. पक्षी सप्ताहानिमित्त आयोजित तलाव परिसर स्वच्छता अभियानात नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानाचे उपविभागीय अधिकारी विशाल बोऱ्हाडे यांनी पक्षी, त्यांचा अधिवास, पक्ष्यांचे व अधिवासाचे संरक्षण याविषयी यावेळी मार्गदर्शन केले. या अभियानात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचे वनपरिक्षेत्राधिकारी विजय धांडे,वाघ, विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे, नवेगावबांध वन परिक्षेत्र प्रादेशिक वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी रोशन दोनोडे नवेगाव राऊंड ऑफिसर बी.बी.शिवणकर,
पवनी राऊंड ऑफिसर दत्तात्रय वैद्य,
बाराभाटी राऊंड ऑफिसर व्ही. एम. करंजेकर,बोरटेकडी राऊंड ऑफिसर एन.के.सरकार,वनरक्षक कु. भेलावे, कु.रहिले व इतर वनकर्मचारी यांच्यासह राष्ट्रीय उद्यान, प्रादेशिक वन विभाग, विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे , सह वन परिक्षेत्राधिकारी , वनरक्षक, कर्मचारी, वनमजूर या अभियानात सहभागी झाले होते.या बरोबरच गोंदिया वनविभाग अंतर्गत चिचगड वनपरिक्षेत्रात पक्षी सप्ताहनिमित्त पक्ष्यांचे आदिवास क्षेत्रात साफसफाई अभियान राबविण्यात आला.पक्ष्यांचे अधिवास टिकून राहावा या साठी वनक्षेत्र समोरील तलाव परिसरातील मानवनिर्मित कचऱ्याचे उच्चाटन करण्यात आले.