सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन.
विद्या प्रसारक संस्था द्वारा संचालित सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ ला राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागाचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र जी जयस्वाल हे होते तर प्रमुख अतिथी डॉक्टर कुलसंगे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही डॉ. पंकज पवार सामाजिक सेवा अधीक्षक जिल्हा शासकीय रुग्णालय चंद्रपूर हे असून अरविंद जयस्वाल सचिव विद्या प्रसारक संस्था , सुदाम खोबरागडे सदस्य विद्या प्रसारक संस्था यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिराचे उद्घाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी व क्रांतीवीर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमे समोर दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. विजेंद्र बत्रा यांनी केले. राष्ट्रहितासाठी रक्तदान करणे किती आवश्यक आहे हे प्रास्ताविकातून स्पष्ट करून सांगितले. प्रमुख अतिथी डॉ. पंकज पवार व डॉक्टर कुरसंगे यांनी शासकीय रुग्णालयांना रक्ताची किती आवश्यकता असते त्यांची विवेचन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना योगेंद्र जयस्वाल यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगून रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असे मत मांडलेत
रक्तदानाचा प्रारंभ रासेयो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ.लेमदेवदे नागलवाडे व प्राध्यापक लिलाधर बेद्रे यांनी रक्तदान करून केला या शिबिरात एकूण ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले हे शिबिर यशस्वी करण्याकरिता चंद्रपूर शासकीय महाविद्यालय तंत्रज्ञ डॉक्टर गुणवंत जाधव , जय पचारे लक्ष्मणा नगराळे सिंन्देवाही, ग्रामीण रुग्णालयातील श्रद्धा ताजने व डॉ. वनिता न्यालेवार यांनी मौलिक सहकार्य केले.
शिबिर यशस्वी करण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक जनबंधू मेश्राम सहकारी डॉ. रिजवान शेख प्रा. अमित उके डॉ. मेघराज देवासे नँक समन्वयक डॉ. राजेश डहारे तसेच प्राध्यापक वर्ग तथा शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले