यशकथा-1 बारदाना निमिर्तीतुन बारा महिलांना रोजगार

 

यशकथा-1 बारदाना निमिर्तीतुन बारा महिलांना रोजगार

शिवणीबांध येथील प्रमिला चांदेवार यांच्या

रमाई बचतगटाचा पुढाकार

भंडारा दि. 7 : परिस्थीतीचे धागे कीतीही उसवले असले तरी ते नीट सांधण्याची किमया फक्त स्त्रीच करु शकते. अशीच बारदाणा निर्मितीतुन महीन्याला 30 ते 40 हजार आर्थिक मिळकतीची किमया साधली आहे. साकोली तालुक्यातील शिवणीबांध येतील रमाई बचतगटाने बचतगटाकडून बारदाणा निर्मितीकडे कसे वळले याबाबत बोलतांना प्रमीला चांदेवार सांगतात की, आजुबाजुच्या खेडयातून किराणा दुकानदाराकडुन व सिंमेट कंपन्याकडून बारदाणा निर्मितीसाठी माविमतर्फे देण्यात आले. त्यामध्ये 1997 पासून बचतगटात कार्यरत आहे. पाच एकर धान शेतीसह काम करतात. बचतगटाच्या माध्यमातुन मिळणाऱ्या कर्जाद्वारे शेतात व घरात ही बोरवेल केले. तसेच त्यांच्या दोन मुलीपैकी लहान मुलगी फॅशन डिझाईनीगचा कोर्स करत आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळाने बचतगटाव्दारे अनेक महिलांना अर्थसाक्षर केले आहे. अनेक महिला प्रयोगशील असल्याने त्यांनी पारंपरिक उदयोग-व्यवसायापेक्षा शेतीला आवश्यक अश्या साहित्याची निर्मित करण्यासाठी देखील पुढाकार घेतला. त्यातच शेतकऱ्यांना पिक साठवणुकीसाठी देखील मोठया प्रमाणावर पोते म्हणजे बारदाणाची गरज असते. त्यामध्ये त्यांनी बचतगटाच्या माध्यमातुन बारदाणा शिवण्यासाठी इतर महिलांना प्रोत्साहीत केले. त्यांना वर्क ऑर्डर नुसार काम करून देणे वेळेत अपेक्षीत असते. कोरोना काळात या व्यवसायावर थोडा परिणाम झाला. मात्र आता पुन्हा बारदाणा मागणीने व्यवसाय तेजीत आला आहे. भंडारा जिल्हयातील गावागावात बचतगटाचे जाळे आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप काठोडे यांच्यासह सर्व सहयोगीनी व माविमची टीम उत्तम काम करत आहे.

शैलजा वाघ-दांदळे  जिल्हा माहिती अधिकारी  भंडारा