अभाविप जिल्हात राबविणार ‘आम्ही ग्रामरक्षक अभियान’
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ब्रम्हपुरी जिल्हा द्वारा कोरोना काळात जिल्हातील काही गावात सेवाकार्य सुरु आहे. त्यात राशन किट वाटप, भोजन वाटप, मास्क वाटप, निर्जंतुकीकरण, कोरोना लसीकरण जनजागृती, कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची व्यवस्था, रक्तदान शिबिरांचे आयोजन, प्लाज्मा दान, आयुर्वेदिक काढा वितरण असे विविध प्रकारचे सेवाकार्य सुरु आहेत.
आगामी 18 जून ते 25 जून या कालावधीत अभाविप संपूर्ण जिल्हात ‘आम्ही ग्रामरक्षक’ हे अभियान राबविणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्हातील अभाविपचे कार्यकर्ते थर्मल स्क्रीनिंग, निर्जंतुकीकरण, कोरोना लसीकरण जनजागृती करणार आहेत त्याचप्रमाणे हे अभियान ब्रम्हपुरी जिल्हातील 4 तालुक्यांमध्ये, 16 गावातील 350 परिवार व 3000 लोकापर्यंत पोहचण्याचा मानस आहे यात 35 कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून अतिदुर्गम ग्रामीण भागात कोरोना लसीकरणा संदर्भात लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर होईल तसेच ‘देश हमे देता है सब-कूछ, हम भी तो कूछ देना सिखे’ या भावनेणे अभाविप च्या या ‘महा अभियानात’ समाजातील युवा विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संयोजक प्रविण गिरडकर यांनी केले आहे.