कापसी ग्रामसेवकाचे नियमबाह्य कामे – विजय कोरेवार
सभापती,पं.स.सावली यांनी दिले ग्रामसेवकावर कारवाईचे संकेत
सावली : कापसीचे प्रभारी ग्रामसेवक नन्नावरे यांच्याविरुद्ध सरपंचाचे तक्रारी असून प्रत्यक्षात पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी भेट दिली असता नियमबाह्यरीत्या कामे केल्याचे उघड झाल्याने चांगलीच कानउघाडणी केली. कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याचे संकेत सभापती कोरेवार यांनी दिले.
कापसी ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून सुनिता काचीनवार यांची फरवरी महिन्यात निवड झाली. तेव्हापासून कारभार सांभाळत आहेत मात्र तब्बल तीन महिने लोटूनही बँकेचे खातेदार सचिवाने बदलविले नाही,मासिक सभा दोन महिन्यांपासून घेण्यात आलेले नाही,ई टेंडरसाठी सचिवाने दुसऱ्या सरपंचाची डीएस्सी जोडून टेंडरिंग केले. घरकुलधारकांकडून प्रमाणपत्रासाठी पैसे घेणे या तक्रारी प्राप्त झाले होते. यातच ग्रामसेवक मागील 12 दिवसापासून ग्रामपंचायतला गैरहजर असून नाली उपसा करणाऱ्या मजुरांची मजुरी प्रलंबित असल्याने मजूर मजुरीविना परत जात असल्याची माहिती सभापती यांना मिळाली होती. त्यांनी सचिव नन्नावरे यांना उपस्थित राहून मजुरांची मजुरी देण्याचे निर्देश दिले होते. सभापती कोरेवार हे पंचायत समिती सदस्य गणपत कोठारे यांचेसह ग्रामपंचायतला अचानक भेट दिली असता सरपंच सुनिता काचीनवार, उपसरपंच शारदा कोहळे, सचिव मनोहर ननावरे उपस्थित होते.
रेकार्डची तपासणी केली असता बँक खात्याचे संयुक्त खातेदार सरपंच यांना न करता खर्च केल्याचे निदर्शनास आले. यावरून सरपंच यांना अधिकारापासून वंचित ठेऊन कारभार करीत असल्याने सभापती कोरेवार यांनी ग्रामसेवकाची चांगलीच कानउघाडणी केली व चौकशी करून कारवाई करणार असल्याचे संकेत दिले.