क्रिडा संकुलला निधी कमी पडू देणार नाही – क्रिडा मंत्री सुनील केदार
चंद्रपूर दि. ४: जिल्ह्यातील क्रिडा संकुलासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असे प्रतिपादन राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.
क्रिडा मंत्री सुनील केदार यांनी बल्लारपूर येथील क्रिडा संकुलाची काल पाहणी केली. यावेळी आ.सुधीर मुनगंटीवार, आ.सुभाष धोटे, क्रिडा उपसंचालक अविनाश पुंड, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा क्रिडा अधिकारी विनोद ठिकरे, माजी क्रिडा अधिकारी अब्दुल मुश्ताक तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते
क्रिडा मंत्री सुनील केदार यांनी यावेळी बल्लारपूर क्रिडा संकुलला सोलर पॅनल तसेच संरक्षण भिंत इत्याची कामाची दुरस्ती करण्याबाबत क्रिडा विभागाला निर्देश दिले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर क्रिडा संकुलाचा उपयोग क्रिडा प्रशिक्षणासाठी करण्यात यावा, असे मत व्यक्त केले.
सैनिक शाळेतील शहीद विरांचे पुतळे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी
क्रिडा मंत्री सुनील केदार यांनी काल चंद्रपूर येथील सैनिक शाळेला भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्यातील सैनिकी शाळा ही देशातील आजमितीला असणाऱ्या सर्व सैनिकी शाळांपैकी अतिशय उत्तम असून त्यामध्ये भारतातील अद्ययावत असे सैनिकी ग्रंथालय, शॉपिंग कॉम्पेक्स, जलतरण तलाव, वसतीगृह, फायर स्टेशन, हॉकी, फूटबॉल तसेच शहीद विरांच्या इतिहासाला दर्शविण्यासाठी पुतळे देखील उभे राहत आहेत. शहीद विरांचे हे पुतळे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.