chandrapur I चंद्रपूर जिल्‍हयातील नगर परिषद, नगर पंचायतीच्‍या निवडणूकांसह पोट निवडणूका सहा महिने पुढे ढकलाव्‍या – भाजपाच्‍या शिष्‍टमंडळाची जिल्‍हाधिका-यांकडे मागणी.

चंद्रपूर जिल्‍हयातील नगर परिषद, नगर पंचायतीच्‍या निवडणूकांसह पोट निवडणूका सहा महिने पुढे ढकलाव्‍या – भाजपाच्‍या शिष्‍टमंडळाची जिल्‍हाधिका-यांकडे मागणी

आम्‍ही मुख्‍यमंत्र्यांच्‍या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलन थांबविले, मुख्‍यमंत्र्यांनी आमच्‍या मागण्‍या मान्‍य कराव्‍या 

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता शासन लॉकडाऊन लागू करण्‍याचा विचार करीत आहेत अशा परिस्‍थीती चंद्रपूर जिल्‍हयातील नगर परिषद, नगर पंचायतीच्‍या सार्वत्रीक निवडणूका तसेच पंचायत समिती व जिल्‍हा परिषदेच्‍या पोट निवडणूका सहा महिने पूढे ढकलाव्‍या अशी मागणी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी केली आहे.
 
भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात एका शिष्‍टमंडळाने आज जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांची भेट घेत वरील मागणीसंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी झालेल्‍या चर्चेदरम्‍यान देवराव भोंगळे यांनी मागणी संदर्भात आपली भूमीका विशद केली. दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ रोजी मा. मुख्‍यमंत्र्यांनी कोरोनाच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यातील जनतेला संबोधित केले. राजकीय, धार्मीक, सामाजिक कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्‍याची भूमीका जाहीर करत जनतेने खबरदारी न घेतल्‍यास लॉकडाऊन लागू करण्‍यात येईल, असेही मुख्‍यमंत्री म्‍हणाले. चंद्रपूर जिल्‍हयात सुध्‍दा अनेक निर्बंध लागू करण्‍यास सुरूवात झाली आहे. जिल्‍हयात चिमूर नगर परिषद, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, जिवती, कोरपना, या नगर पंचायतीच्‍या सार्वत्रीत निवडणूका तर जिल्‍हा परिषदेच्‍या दोन जागेसाठी व पंचायत समित्‍यांच्‍या चार जागांसाठी व बल्‍लारपूर नगर परिषदेच्‍या 2 जागांसाठी पोट निवडणूक घेण्‍यात येणार आहे. यासाठी मतदान यादीची कामे सुध्‍दा पूर्ण झाली आहेत. या निवडणूकींचा कार्यक्रम जाहीर होण्‍याची शक्‍यता आहे. कोरोना पुन्‍हा डोके वर काढायला लागला आहे. अशा परिस्‍थीती या निवडणूका घेणे योग्‍य होणार नाही, म्‍हणून या निवडणूकी सहा महिने पुढे ढकलाव्‍या अशी मागणी देवराव भोंगळे यांनी यावेळी केली.
 
जिल्‍हयातील गोरगरीब नागरिक व शेतक-यांचे विज कनेक्‍शन्‍स कापण्‍याच्‍या मोहीमेला स्‍थगिती द्यावी व अवकाळी पावसाच्‍या फटका बसलेल्‍या शेतक-यांना आर्थिक मदत द्यावी
 
दिनांक २४ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे कोरोना काळातील गोरगरीब जनतेची विज बिले माफ करावी व अवकाळी पावसाचा फटका बसलेल्‍या शेतक-यांना आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी जेल भरो आंदोलन जिल्‍हयात पुकारण्‍यात आले होते. मा. मुख्‍यमंत्र्यांनी जनतेला व राजकीय पक्षांना केलेल्‍या आवाहनानुसार हे आंदोलन स्‍थगित करण्‍यात आले आहे. आम्‍ही मा. मुख्‍यमंत्र्यांच्‍या आवाहनाला सकारात्‍मक प्रतिसाद देत आंदोलन स्‍थगित केले. त्‍याचप्रमाणे मा. मुख्‍यमंत्र्यांनी सुध्‍दा आमच्‍या मागणीला प्रतिसाद देत लॉकडाऊनच्‍या काळातील गोरगरीबांची विज बिले माफ करावी व तुर्तास विज कनेक्‍शन कापू नये त्‍याचप्रमाणे अवकाळी पावसाचा फटका बसलेल्‍या शेतक-यांना आर्थीक मदत द्यावी, अशी मागणी देखील देवराव भोंगळे यांनी यावेळी केली.
 
शिष्‍टमंडळाच्‍या भावना व मागण्‍या शासनापर्यंत योग्‍य माध्‍यमातून पोचविण्‍यात येईल असे आश्‍वासन जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांनी शिष्‍टमंडळाला दिले. शिष्‍टमंडळात देवराव भोंगळे यांच्‍यासह जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, उपाध्‍यक्षा सौ. रेखा कारेकर, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस संजय गजपूरे, जिल्‍हा परिषदेचे सभापती नागराज गेडाम, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा अध्‍यक्ष अॖ ड. हरीश गेडाम, जि.प. चे माजी सभापती संतोष तंडपल्‍लीवार यांची उपस्थिती होती.