अपयशातूनही यशस्वी मार्ग काढण्याची ताकत तुरुणांच्या सळसळत्या रक्तांत असते. फक्त त्यांना योग्य संधी हवी, विविध क्षेत्रात युवकांनी यशस्वी शिखर गाठत प्रेरणादाई कतृत्व सिध्द करुन दाखविले आहे. आता युवकांनी औद्योगीक क्षेत्रातही समोर येण्याचे आवाहण करत औद्योगीक क्रांतीसाठी युवा उद्योजगांची गरज असल्याचे प्रतिपादन आ. किशोर जोरगेवार यांनी केले. आज एम आय डि सीत सुरु झालेल्या स्वराज फुड कंपनीचे उद्घाटन आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सुभाष बेरड, प्रमोद बाभिटकर, लिना पाचभाई, आकाश सिंग, उषा आंबडे, संदिप बदखल, रमेश तिवारी आदि मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, सध्या बेरोजगारीच्या सावटाखाली आजचा सूशिक्षित यूवक जगत आहे. कोरोनामूळेही अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी छोटे मोठे उद्योग गरजेचे आहे. तसेच युवा उद्योजगांनी यात कौशल्य दाखविण्याची गरज आहे. छोटे मोठे नवे उद्योग चंद्रपूरात सुरु करण्यासाठी शासकीय स्तरावर लागणारी पूर्ण मदत आम्ही करायला तयार असल्याचेही यावेळी आ. जोरगेवार म्हणाले. अनेक लोक नौकरीच्या शोधात असतात मात्र स्वत:च्या व्यवसाय सुरु करण्यात त्यांची फारशी आवड नसते, त्यामूळे रोजगार उपलब्धता कमी होत असल्याचेही यावेळी ते बोलले. या उद्योगाच्या माध्यमातून स्वराज्य नमकीन संपूर्ण महाराष्ट्रात नेण्याचा आपला संकल्प चांगला असून ग्रामीण भागातून येऊन मोठा उद्योग उभारणे कौतुकास्पद असल्याचेही यावेळी ते म्हणाले या प्रसंगी त्यांनी संपूर्ण कंपनीची पाहणी करुन शुभेच्छा दिल्यात.