धान/भरडधान्य खरेदी करीता ऑनलाईन शेतकरी नोंदणीला मुदतवाढ
दि.22 आधारभूत किंमत धान खरेदी योजना रब्बी पणन हंगाम 2023-24 अंतर्गत धान/भरडधान्य (मका) करिता ऑनलाईन नोंदणी दि.20/06/2024 अखेर मुदत देण्यात आली होती. जिल्ह्यामध्ये मागील हंगामाच्या तुलनेत अजुनही ऑनलाईन शेतकरी नोंदणी झालेली नसल्याने शासनाच्या पत्रानुसार धान/भरडधान्य खरेदी करीता ऑनलाईन शेतकरी नोंदणीला दि.30/06/2024 अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
तरी शेतकऱ्यांनी रब्बी पणन हंगाम 2023-24 मध्ये धान विक्री करण्याकरिता आपल्या नावाची नोंदणी नजिकच्या केंद्रावर जाऊन करावी व त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे जसे की जमिनीचा ऑनलाईन सातबारा उतारा (चालू हंगामाचा पिकपेरा असलेला), नमुना 8 अ, बँकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश, अद्यावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे खरेदी केंद्रावर नेऊन तिथे आपली नावे नोंदवावी. जेणेकरून रब्बी पणन हंगाम 2023-24 मध्ये धान विक्री करता येईल. शेतकरी बाधवांनी उन्हाळी धान खरेदीसाठी नजिकच्या शासकिय धान/भरडधान्य खरेदी करणाऱ्या संस्थांकडे कागदपत्र सादर करुन रब्बी हंगाम 2023-24 धान खरेदीकरीता ऑनलाईन शेतकरी नोंदणीचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांच्याकडुन करण्यात येत आहे.