जिल्ह्यात 26 कोरोनामुक्त, 23 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु
चंद्रपूर,दि. 3 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 26 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 23 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 1 बाधिताचा जिल्हयात मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 23 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 6, चंद्रपूर तालुका 0 , बल्लारपूर 2, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0 , नागभिड 0, सिंदेवाही 0, मूल 4, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 1, चिमूर 1 , वरोरा 4, कोरपना 2, जिवती 3 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील 1 पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 730 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 2 झाली आहे. सध्या 196 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 66 हजार 88 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 78 हजार 841 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1532 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.