गोंडवाना गडचिरोली विद्यापीठाच्या शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्कात कपात : अ.भा.वि.प. च्या मागणी ला यश
गोंडवाना गडचिरोली विद्यापीठाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र २०२०-२१ च्या शैक्षणिक शुल्कात कपात आणि सर्व विद्यार्थ्यांचे सत्र २०२१-२२ च्या शैक्षणिक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच उन्हाळी २०२१ च्या परीक्षा शुल्कात १०% नी कपात करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.या तीन्ही निर्णयाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली शाखा स्वागत करते.
कोरोनामूळे विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.अशा परिस्थितींमध्ये विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त महाविद्यालय शुल्क आणि परीक्षा शुल्क घेत होते.याच्या विरोधात अभाविप गडचिरोली शाखेने १ मार्च ला विद्यापीठाला निवेदन दिले.तसेच अभाविप तर्फे झालेल्या ऑनलाईन आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा केल्यामुळे विद्यापीठाने २९ जून रोजी शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला.विद्यापीठाने शैक्षणिक शुल्क २०२०-२१ चे इंद्रधनुष्य, आव्हान,अविष्कार,विद्यार्थी कल्याण निधी,विद्यार्थी वैद्यकीय मदत शुल्क,विद्यार्थी संघ शुल्क,आपत्ती व्यवस्थापन शुल्क या मध्ये १००% माफ आणि ग्रंथालय शुल्क,पर्यावरण शुल्क,प्रयोगशाळा शुल्कात ५०% माफ करण्यात आले.तसेच उन्हाळी -२१ चे परीक्षा शुल्कात १०% कपात करण्यात आली.या निर्णयामुळे २ लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.