तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारासाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 29 जून: केंद्र शासनाच्या युवक कल्याण योजनेअंतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार सन-2020 करीता नामांकनाचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे. जिल्ह्यातील खेळाडूंनी दि. 15 जून ते 5 जुलै 2021 या कालावधीत आवश्यक माहिती, कागदपत्रे, प्रमाणपत्रे, कात्रणे इत्यादीसह नामांकन प्रस्ताव सादर करावयाचे आहे.
नामांकने सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षातील म्हणजेच सन 2018, 2019 व 2020 मधील असणे आवश्यक आहे. तसेच साहसी उपक्रम हे जमिनीवरील, समुद्रावरील व हवेमधील असावे. खेळाडूंची कामगिरी अतिउत्कृष्ट असणे आवश्यक आहे. तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार सन-2020 करीता नामांकने प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचे आहेत.
तरी उपरोक्त आवश्यक माहितीसह तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार सन-2021 करीता जिल्ह्यातील खेळाडूंनी आपली नामांकने प्रस्ताव दिलेल्या विहित कालावधीत https://dbtyas-youth.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर करावी. तसेच आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे या कार्यालयाच्या desk10.dsys-mh@gov.in किंवा dsysdesk10@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात यावी. सदर प्रस्तावाची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी कळविले आहे.