दैनिक पुढारी चे जाफराबाद प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाबळे यांना वाळू माफिया कडून जिवेमारण्याचं प्रयत्न
दैनिक पुढारी चे जाफराबाद प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाबळे यांचे वर भर दिवसा पंचायत समिती समोर वाळू माफियांनी लाठ्या काट्यांनी केलेल्या भ्याड हल्ला प्रकरणी “पत्रकार सुरक्षा कायद्या अंतर्गत गुन्हादाखल करून कठोर कार्यवाही करणे बाबत.आज सिंदेवाही चे तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांचे मार्फत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुरोगामी पत्रकार संघ शाखा सिंदेवाही यांच्या वतिने देण्यात आले.
पत्रकारांवर भ्याड हल्ले होऊ नयेत यासाठीचा केलेला कायदा फक्त कागदोपत्री असून,या कायद्याची काटेकोर पणे अंमल बजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील जीवघेणे भ्याड हल्ले वाढले आहेत.याचे ताजे उदाहरण म्हणजे जाफराबाद येथील दैनिक पुढारी चे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाबळे यांनी वाळू तस्करांविरुद्ध बातमी लिहिली होती.याचा वचपा काढण्यासाठी वाळू तस्करांच्या टोळीने भर दिवसा पंचायत समिती समोर लाठ्या-काठ्यांनी जीवघेणा भ्याड हल्ला केला.आणि लोकशाहीच्या चौथ्या स्थंभाला आघात पोहचविण्याचा प्रयत्न केला.
पत्रकारांची ही मुस्कटदाबी महाराष्ट्रात सर्रास सुरू असून,या प्रकरणी
१)हल्लेखोरांना जमीन मिळू नये.
२)पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून प्रत्येकी ३ लाख रुपये वसूल करून ती रक्कम पीडित ज्ञानेश्वर पाबळे यांना देण्यात यावी.
३)वाळू तस्करीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे.
४)संबंधित पत्रकाराला सुरक्षा पुरविण्यात यावी.
५)पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याप्रसंगी फिर्याद दाखल करण्यात कसूर करणाऱ्या सबंधितांना कायमचे निलंबित करण्यात यावे.
इत्यादी पुरोगामी पत्रकार संघाच्या मागण्या असून,या सबब संबंधाने १५ दिवसाच्या आत कार्यवाही न झाल्यास पुरोगामी पत्रकार संघामार्फत राज्यभर निदर्शने करण्यात येतील.असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतांना पुरोगामी पत्रकार संघ शाखा सिंदेवाही चे अध्यक्ष मिथुन मेश्राम, उपाध्यक्ष कुनाल उंदीरवाडे ,कार्याध्यक्ष आक्रोश खोब्रागडे , सचिव सुनील गेडाम , सहसचिव जितेंद्र नागदेवते , कोषाध्यक्ष अमान कुरेशी , संपर्कप्रमुख अमोल निनावे , संघटक मुकेश शेंडे , प्रसिद्ध प्रमुख वीरेंद्र मेश्राम, सदस्य अंबादास दूधे उपस्थित होते.