जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हळद पिकाचा पर्याय निवडावा
मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन
Ø पीक विविधतेसाठी हळद हा एक चांगला पर्याय
Ø कमी कालावधीत हातात येणारे नगदी पीक
Ø “कुरकुमीन” या घटकाचे प्रमाण जास्त
Ø मागील वर्षी 10 हजार रुपये पर्यंत मिळाला भाव
Ø चांगल्या दर्जाचे हळद बियाणे उपलब्ध
- चंद्रपूर दि. 13 मे : मागील खरीप हंगामामध्ये जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात हळद बियाणे उत्पादनाचा कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यात येवून एकूण 148 शेतकऱ्यांमार्फत 250 एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. लागवडीकरिता “प्रगती” वाणाची निवड करण्यात आली होती. या वाणाचे उत्पादन 200 ते 230 क्विंटल प्रति हेक्टर मिळाले आहे. तसेच या वानामध्ये “कुरकुमीन” या घटकाचे प्रमाण सुद्धा पारंपरिक वाणाच्या तुलनेत अधिक आढळले आहे. मागील हंगामामध्ये ओल्या हळदीला बाजारामध्ये 1200 रुपये पर्यंत तर वाळलेल्या हळदीला 9000 ते 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीज जास्त शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाच्या हळद वाणाची लागवड करून आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
- चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पिकांमध्ये भात, कापूस, तूर, सोयाबीन यांचा सामावेश होतो. पीक पद्धतीमध्ये बदल ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यासाठी विस्तार कार्य आणि मनुष्यबळ अत्यंत आवश्यक आहे. त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी जागतिक बाजारपेठेतील मागणी बघता पुढील काळात पीक बदलाकरिता हळद हा एक चांगला पर्याय असणार आहे. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून हळद लागवडीला प्रोत्साहन देण्याचे नियोजन केले असून बियाणे, इतर निविष्ठा तसेच हळद निर्मितीसाठी आवश्यक उपकरणे यासाठी अनुदान दिले जाते.
- कमी कालावधीत हातात येणारे नगदी पीक अशी हळदीची आोळख आहे. आहार, औषध निर्मिती, सौंदर्य प्रसाधन आणि धार्मिक विधी यासाठी हळदीचा वापर होतो . जमिनीचा कस वाढविणे, कीड व रोगाचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असणे तसेच रानडुकरांचा उपद्रव कमी असतो चंद्रपूरसारख्या जंगलव्याप्त प्रदेशात हे विशेष मह्त्वाचे आहे. हळद पिकाचे फायदे सुद्धा खूप आहेत. जागतिक बाजारपेठेतील मागणी बघता पुढील काळात पीक विविधतेसाठी हळद हा एक चांगला पर्याय असणार आहे.
- हळद लागवडीकरिता प्रगती या वाणाचे बियाणे शेतकरी उत्पादक कंपनी कवडू अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, मुल, विक्रेते: नितेश येनपरेड्डिवार 9763427506. संगोपन फार्मर प्रोड्यूसर कंपनी, मुल विक्रेते:श्री.सहारे 9067357835. ग्रामसमृद्धी कृषी विकास आदिवासी फार्मर प्रोड्युसर कंपनी, चंदनखेडा, विक्रेते: महेश नागापुरे 8668959375. कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी,वरोरा, विक्रेते:बालाजी धोबे 9860117436, मानिकादेवी कृषी विकास आदिवासी फार्मर प्रोड्युसर कंपनी सालोरी, विक्रेते: सुनील बावणे 9763234836. कृषकोन्नती कृषी विकास आदिवासी फार्मर प्रोड्युसर कंपनी, टेंमुर्डा विक्रेते:श्री.मरस्कोल्हे 8007748175. बाखर्डी फार्मर प्रोड्युसर कंपनी कोरपना,विक्रेते: संदीप काकडे 8806758903 यांचेकडे उपलब्ध असून त्यांचे संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपल्या जवळच्या FPO कंपनीकडून बियाणे खरेदी करावे.