माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची अन्नत्याग सत्याग्रहात भेट
चंद्रपूर/ प्रतिनिधीरामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी इको प्रोचे सर्व सदस्य आणि शहरातील नागरिकानी बुधवारपासून साखळी उपोषण सुरु केले. माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अन्नत्याग सत्याग्रहाला भेट दिली. यावेळी अध्यक्ष बंङू धोतरे यांच्याशी मागण्याच्या अनुषंगाने चर्चा केली.आज बुधवारी (दि. २४) उपोषणाचा तिसरा दिवस होता. दिवसभरात शहरातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिका-यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला. मंगळवारी तलावातील प्रदूषित पाणी उपसा करून तलावातील प्रदूषण दूर करण्याचा संदेश देण्यात आला. आजपासून सुरु झालेल्या साखळी उपोषणात सेवानिवृत्त, विभागीय वनाधिकारी अभय बडकेलवार, धर्मेंद्र लुनावत, अनिल अडगुरवार, हरीश मेश्राम, प्रतीक मुरकुटे बसले होते.