एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावा बैठक

एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावा बैठक 

आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावा घेतला. या योजनेचा लाभ सर्व नागरिकांना मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पुढाकार घेवून जास्तीत जास्त नागरिकांचे आयुष्यमान कार्ड तयार करावे. कोणीही रूग्ण उपचारापासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी, प्रसंगी कायदा व नियमापेक्षा मानसाचा जीव मोठा आहे याची जाणीव ठेवून रूग्णांवर प्राधाण्याने उपचार करावे. आरोग्य ही मुलभूत हक्काची बाब आहे. लाभ देतांना फक्त रुग्णाचे आयुष्यमान कार्ड किंवा रेशन कार्ड पहावे, नातेवाईकांच्या कार्ड साठी सक्ती करू नये व मोफत उपचारासाठी रूग्णांना वंचित ठेवू नये.
अपघातग्रस्तांना स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात यावा. यासाठी टोल फ्री नंबर 18002332200 याचा वापर करावा. यावेळी योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी व त्रुटीबाबत त्यांनी खाजगी हॉस्पीटलच्या प्रतिनिधींकडून माहित जाणून घेतली. राज्यात मोफत उपचाराची टक्केवारी 30 वरून किमान 85 पर्यंत जावी अशी आपली अपेक्षा असून यासाठी यंत्रणेने नव्या दमाने सुरूवात करण्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला आमदार डॉ. मिलींद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे तसेच शासकीय व खाजगी हॉस्पीटलचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डाॅ. प्रताप शिंदे व डाॅ. माधुरी किलनाके यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्याची माहिती दिली.
गडचिरोली जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी माहे जुलै 2024 पासून आतापर्यंत ८८३ लाभार्थ्यांकडून एकूण ९०२ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी 800 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असल्याचे व त्यापोटी एक कोटी ७७ लाख ३६ हजार ७०० रुपये रक्कम मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख 44 हजार 290 आयुष्यमान कार्ड तयार करण्यात आले असून याचे प्रमाण ४८ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी पत्रकारांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
वरील माहितीवरून मथळ्यासह विस्तृत बातमी तयार करा. यात मोफत उपचाराचे प्रमाण वाढवणे, अपघात विमा, टोल फ्री नंबर व आयुष्यमान कार्ड या बाबी ठळक स्वरूपात घ्याव्या.