चंद्रपुर जिल्हयातील सुगंधीत तंबाकु तस्कर हरीष ठक्कर याचे मानोरा येथील गोडाउन मधून लाखोंचा सुगंधीत तंबाकु जप्त

चंद्रपुर जिल्हयातील सुगंधीत तंबाकु मानोरा येथील गोडाउन मधून लाखोंचा सुगंधीत तंबाकु जप्त

मा. पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले. त्याअनुषगाने पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी वेगवेगळे पथके नेमुन त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. दिनांक ०८/०४/२०२५ गोपनिय बातमिदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी नामे हरीष ठक्कर याने मौजा मानोरा, ता. बल्लारशा, जि. चंद्रपुर येथे किरायाच्या गोडावून मध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाकु साठवून ठेवला आहे अशा खबरेवरुन मौजा मानोरा येथे जावून गोडावून ची झडती घेवून ईगल हुक्का सुगंधीत तंबाकु, होला हुक्का सुगंधीत तंबाकु तसेच मजा १०८ सुगंधीत तंबाकु असा एकुण ५,०६,९१०/-रूपयांचा माल जप्त करून नमुद आरोपी नामे हरीष अंबाराम ठक्कर, रा. विवेकानंद वार्ड, बल्लारशा, ता. बल्लारशा, जि. चंद्रपुर यांचेविरूध्द पोलीस स्टेशन बल्लारशा, जि. चंद्रपुर येथे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि. मधुकर चंद्रया सामलवार, सफौ. / २०४० धनराज करकाडे, पोहवा /१४५ सुरेंद्र महतो, पोहवा /१२२७चेतन गज्जलवार, पोअं/८८७ प्रफुल गारघाटे, चापोअं/६०६६ मिलींद टेकाम स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.