हरविलेल्या व्यक्तिबाबत संपर्क करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 2 एप्रिल : लोहमार्ग पोलीस ठाणे, वर्धा यांच्या रिपोर्टनुसार वकीलकुमार टुनाय शर्मा (वय 28) रा. 01 टिपिया टोला, पंचगाछिया थानां, जिला सहरसा, राज्य बिहार हा 21 मार्च 2025 रोजी ट्रेन नंबर 22351 पाटलीपुत्र- बंगलुरु एक्स. चे मागील जनरल कोच मधून त्याचा गावातील लोकांसोबत पाटलीपुत्र ते बंगलुरू असा प्रवास करीत होता. प्रवासादरम्यान 22 मार्च रोजी रात्री 11.45 वा. रेल्वे स्टेशन चंद्रपूर येथे तो ट्रेनमधून खाली उतरला व नंतर पुन्हा ट्रेनमध्ये चढू शकला नाही व बेपत्ता झाला. त्यामुळे रेल्वे पोलिस चौकी बल्लारशहा येथे सदर इसम हरविल्याची तक्रार देण्यात आली. सदर व्यक्ती आढळून आल्यास त्चरीत संपर्क करावा, असे आवाहन रेल्वे पोलिस स्टेशन वर्धाचे तपासी अंमलदार यांनी केले आहे
हरविलेल्या इसमाचे वर्णन : रंग सावळा, उंची 5 फुट 5 इंच, सरळ नाक, डोळे बारीक, दाडी -मिशी बारीक, केस काळे, डोक्यात काळया रंगाची टोपी, भाषा हिंदी, सवय गुटखा खाणे, दारु पिणे, काळया रंगाचा जिन्स पँट व निळया रंगाचा जिन्स जॉकेट घातलेला, शरीर बाधा सळपातळ