राज्‍यभरामध्‍ये “हम करे राष्‍ट्र आराधन” या नाटकाचे प्रयोग शासनाद्वारे प्रदर्शित करण्‍यात यावे – सुरज पेदुलवार

राज्‍यभरामध्‍ये “हम करे राष्‍ट्र आराधन” या नाटकाचे प्रयोग शासनाद्वारे प्रदर्शित करण्‍यात यावे – सुरज पेदुलवार 
 राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाच्‍या शताब्‍दी वर्षानिमित्‍त…..
 राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे २०२५ हे शताब्‍दी वर्ष आहे. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाने राष्‍ट्र उभारणीचे महतनीय कार्य केले आहे. राष्‍ट्रभक्‍तीने प्रेरित संघटनेची स्‍थापना युगप्रवर्तक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ मध्‍ये विजयादशमीच्‍या पवित्र दिवशी नागपूर येथे केली. तेव्‍हा पासून या संघटनेने हिंदू समाजाच्‍या संघटनाकरिता आणि राष्‍ट्रउन्‍नतीकरिता अतुलनिय कार्य केले आहे. संघाच्‍या या महान कार्याची शताब्‍दी २०२५ पासून सुरु होत आहे. या विशेष प्रसंगी राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाची स्‍थापना, कार्यपध्‍दती तसेच स्‍वतंत्रता संग्रामामधील सक्रीयता यावर आधारीत “हम करे राष्‍ट्र आराधन” या महानाटकाचे प्रयोग शासनाद्वारे राज्‍यभरात प्रदर्शित करण्‍यात यावे, अशी मागणी राज्‍याचे सांस्‍कृतिक कार्य मंत्री मा.ना. आशिषजी शेलार यांचेकडे चंद्रपूर भाजपा जिल्‍हा महामंत्री सुरज पेदुलवार यांनी केली आहे. या नाटकाच्‍या माध्‍यमातुन संघ विचारांची आणि कार्यपध्‍दतीची प्रेरणा नव्‍या पिढीपर्यंत पोहोचेल तसेच राष्‍ट्रप्रेम, सेवा आणि संस्‍कारांचे मोल अधोरेखित होईल हा या मागील उद्देश आहे.