आमदार अभिजित वंजारी चंद्रपूर जिल्ह्याचे निरीक्षक

आमदार अभिजित वंजारी चंद्रपूर जिल्ह्याचे निरीक्षक

चंद्रपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांची काँग्रेसच्या चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतेच त्यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले.

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात एका ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती करण्यात येत आहे. याअंतर्गत आमदार अभिजित वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्लॉक अध्यक्ष, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून पुढील 15 दिवसांत अहवाल सादर करावयाचा आहे.

आमदार अभिजित वंजारी यांच्या नियुक्तीमुळे चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी समर्थपणे पार पाडेल आणि काँग्रेस पक्षाच्या विकासासाठी आणि संघटनेच्या सशक्तीकरणासाठी आपण नेहमी कटिबद्ध राहणार असल्याचे आमदार अभिजित वंजारी यांनी या नियुक्तीनंतर सांगितले.