महात्मा फुले विद्यालय सिंदेवाही येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

महात्मा फुले विद्यालय सिंदेवाही येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

महात्मा फुले विद्यालय सिंदेवाही येथे आद्य शिक्षिका ,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुले सामाजिक व सांस्कृतिक शिक्षण मंडळ्याच्या संचालिका डॉ.सरिता ढोले या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक पारिजात ढोले,सारस्वत ढोले हे होते तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर उईके उपस्थित होते.सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे व गीते सादर करण्यात आली.मीनाक्षी मडावी हिने ” मी सावित्रीबाई बोलतेय,,हा एकपात्री नाटक सादर केला.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षा,विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक पुंडलिक लोनबले, शिक्षिका सदनपवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली.कार्यक्रमानिमित्त रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्नती तोरणकर व आभार प्रदर्शन किमया गुरू या विद्यार्थिनीने केले.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.