गडचिरोली तालुक्यातील 103 निराधारांना मिळणार अर्थसहाय्य संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक
गडचिरोली,दि.12: विशेष सहाय्य योजने अंतर्गत निराधार वृध्द व्यक्ती, अंध, अंपग, शारीरीक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी महिला, अनाथ बालके आदीचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी त्यांना विविध योजनेच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य दिले जाते. योजनांचा लाभ अधिकाधिक नागरीकांपर्यंत पोचविण्या करीता गडचिरोली तालुक्यात शासन आपल्या दारी, विकसीत भारत संकल्प यात्रा, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण तसेच जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांचे विहित नमुन्यात अर्ज तलाठयां मार्फत भरुन घेण्यात येतात.
विशेष सहाय्य योजने अंतर्गत प्राप्त झालेले अर्ज दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी संजय गांधी निराधार योजना समिती गडचिरोली समोर ठेऊन समितीचे अध्यक्ष संतोष बंडू आष्टीकर तहसिलदार, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजीत करण्यात आली. सदर सभेला सुर्यकांत पिदुरकर. मुख्याधिकारी, नगर परिषद, गडचिरोली व अनिकेत पाटील संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती. गडचिरोली हे शासकिय सदस्य उपस्थित होते.
सभेत खालील प्रमाणे अर्ज मंजुर/नामंजुर करण्यात आले. संजयगांधी निराधार अनुदान योजना एकुण प्राप्त प्रकरणे 54, मंजुर प्रकरणे 52, नामंजुर प्रकरणे 2, इंदिरागांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना एकुण प्राप्त प्रकरणे 4, मंजुर प्रकरणे 3, नामंजुर प्रकरणे 1, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना एकुण प्राप्त प्रकरणे 53, मंजुर प्रकरणे 48, नामंजुर प्रकरणे 5 .
सदर सभेकरीता डी. ए. ठाकरे नायब तहसिलदार, (सं.गां.यो) तहसिल कार्यालय गडचिरोली, कु. ममता शेंडे, सहा. म. अधिकारी, श्रीमती सुधा गणविर, सहा. म. अधिकारी एस. जे. नरूले महसुल सहाय्यक, कु. रजनी डोंगरे, (इंगायो) डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी विशेष सहाय्य योजनेची प्रकरणे निकाली काढण्यास सहकार्य केले.
विशेष सहाय्य योजने अंतर्गत शासनाच्या नियमानुसार सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता पात्र लाभार्थ्यांचे अर्ज तहसिल कार्यालयात तलाठ्यां मार्फत सादर करणेबाबत संतोष बंडू आष्टीकर तहसिलदार, . गडचिरोली यांनी जाहिर आवाहन केले आहे.