13 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा

13 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा

चंद्रपूर, दि. 11 : दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन निधी म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. आपल्या जिल्हयाचा ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम व माजी सैनिक मेळावा 13 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10.30 वाजता नियोजन भवन येथे साजरा होणार आहे.

यावेळी ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कार्य करणा-या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचा भेट वस्तु, स्मृती चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सन्मान, शहीद सैनिकांच्या वीर पत्नी, वीर माता/पिता, शोर्य चक्र प्राप्त सैनिक यांचा शॉल व श्रीफळ देवून सन्मान व माजी सैनिकांच्या पाल्यांना धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे.

तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने माजी सैनिकांनी हजर राहावे, असे आवहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे..