कामाच्या ठिकाणी तक्रार समिती स्थापन करणे अनिर्वाय

कामाच्या ठिकाणी तक्रार समिती स्थापन करणे अनिर्वाय

गडचिरोली,दि.11 : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय, अशासकीय कार्यालय, दुकाने, वैदयकीय सेवा देणारे, महामंडळ, कंपनी, उदयोगधंदे, औदयोगिक ठिकाणे, करमणुकीचे ठिकाणे, शैक्षणिक संस्था, संघटना, अशासकीय संस्था, खाजगी कार्यालये, इत्यादी जिथे 10 किंवा 10 पेक्षा अधिक कर्मचारी (महिला व पुरुष मिळून) कार्यरत आहेत अश्या प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे अनिर्वाय आहे. समितीमध्ये कार्यालयातील वरिष्ठ पदावर कार्यरत महिलेचे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात यावी. महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या किवा ज्यांना सामाजिक कार्याचा अनुभव आहे किंवा ज्यांना कायदयाचे ज्ञान आहे अशा कर्मचारीमधून किमान दोन सदस्य नियुक्त करावेत. महिलांच्या प्रश्नांशी बांधील असलेल्या अशासकीय संघटना किंवा संघ किंवा लैगिक छळाशी संबंधित प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती यामधील एक अशासकीय सदस्य नेमण्यात यावा. एकुण सदस्यांपैकी 50 टक्के हया महिला सदस्य असणे आवश्यक आहे. अंतर्गत तक्रार समितीचे अध्यक्ष आणि प्रत्येक सदस्य यांची कार्यालय प्रमुखाकडून नियुक्ती करण्यात येईल, समितीचा कार्यकाळ हा 3 वर्षांचा असेल. ज्या कार्यालयात 10 पेक्षा कमी कर्मचारी (महिला व पुरुष मिळून) असल्याने समिती स्थापन होऊ शकत नाही अश्या कार्यालयातील महिला कर्मचारी जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समिती कडे तक्रार करु शकतात, याकरिता जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय बॅरेक क्रंमाक 1 खोली क्रंमाम26,27 कॉम्पलेक्स एरिया गडचिरोली ईमेल dwedgadchiroli@gmail.com येथे संपर्क करावा.

शासनस्तरावर अंतर्गत तक्रार निवारण समिती मधील अध्यक्ष सदस्यांची माहिती आनलाईन अपडेट करावयाची कार्यवाही सुरु असल्याने सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये यांनी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे समिती स्थापन बाबत माहिती सादर करावी.