जिल्हा रुग्णालय : 64,336 रुपयांचा दंड वसूल तंबाखू,गुटख्याचे सेवन :1052 जणावर कारवाई

जिल्हा रुग्णालय : 64,336 रुपयांचा दंड वसूल तंबाखू,गुटख्याचे सेवन :1052 जणावर कारवाई

भंडारा,दि.11 : जिल्हा रूग्णालय येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रुग्णालय परिसर तंबाखु मुक्त राहण्यासाठी रूग्णालयात येणा-या रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांची तपासणी करून तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ जमा केले जाईल. त्यानुसार 15 सप्टेंबर 2024 पासुन ते आतापर्यंत 1052 लोकांवर कार्यवाही करून रू.64336/- दंड वसुल करण्यात आले असून जवळपास 60 किलो मादक पदार्थ जमा करण्यात आले आहे.

या मादक द्रव्याची विल्हेवाट लावण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यांच्या आदेशानुसार व डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्य चिकित्सक, करणकुमार चव्हान मुख्याधिकारी नगर परिषद, यांच्या मार्गदर्शनाखाली 10. डिसेबर, रोजी दुपारी 1.00 वाजता या मादक पदार्थाचे नगर परिषद कार्यालयामार्फत पंचनामा करून प्रशांत मेश्राम, स्वास्थ निरिक्षक, संदीप मेश्राम मुकादम, राजेश दिघोरे वाहन चालक, डॉ. शैलेष कुकडे जिल्हा सल्लागार, कु. कीर्ती बन्सोड कार्यकम सहाययक, तसेच श्रीमती आरती कातुरे, सामाजिक कार्यकर्ती, जिल्हा रूग्णालय, भंडारा याच्या उपस्थितीत जेसीबी ने गड्डा तयार करून त्यात सदर मादक पदार्थाची विल्हेवाट लावण्यात आली.

तसेच जिल्हा रूग्णालय, भंडारा येथे कार्यरत असलेले दिलीप शेन्डे, सोनवाणे, मनिष बळवाईक, राजेश गरपडे, मुकेश लांजेवार व इतर सुरक्षारक्षकांचे सहकार्याने तंबाखू खाणा-यावर कार्यवाही करण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालय, येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखुच्या दुष्परीणामाबाबत जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रम राबविले जातात जसे तंबाख जन्य पदार्थ सोडण्यासाठी गटचर्चा घेऊन रुग्णांना तंबाखू व तुबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्याने शरिरावर होणाऱ्या दुष्परिणाम विषय समुपदेशन करण्यात आली असून भंडारा जिल्हयातील सर्व शाळेमध्ये जाऊन विविध उपक्रम राबवून मुलामध्ये तंबाखूच्या दुष्परिणामबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय यांनी रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालय परिसरात तंबाखू जन्य पदार्थ खावून रुग्णालय परिसर घाण करु नये असे जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय भंडारा विभागानी कळविले आहे.