मानव -वन्यजीव संघर्ष, व व्यवस्थापनच्या वतीने एक दिवशीय कार्यशाळा संपन्न
भंडारा,दि.09: जिल्हयात मानव -वन्यप्राणी संघर्ष च्या घटना दिवसें दिवस वाढत असल्याने तसेच वन्यजीवांच्या बचाव कार्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी हे महत्त्वाची भूमिका बजावित असून मानव -वन्यप्राणी संघर्ष हाताळताना येणाऱ्या आपातकालीन परिस्थितीमध्ये वन्यप्राणी बचाव कार्यात
पशुवैद्यकीय अधिकारी यांना येणाऱ्या अडचणीचे मार्गदर्शन करण्यासाठी वन्यजीव अभ्यासक व वन्यजीव बचाव कार्यात तज्ञ असलेले डॉक्टर निखिल बनगर यांनी मार्गदर्शन केले तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांचे त्यांनी निराकरण केले .तसेच बनगर यांनी वन्य प्राण्यांच्या रेस्क्यू बाबत व मानव वन्यजीव संघर्ष परिस्थितीमध्ये वन्य कर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांची भूमिका काय असते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले .
सदर कार्यशाळ राहुल गवई उपवनसंरक्षक,यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.तसेच या कार्यशाळेला प्रामुख्याने जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्रीमती डॉक्टर अन्नू वरारकर, उपस्थित होत्या,तसेच भंडारा जिल्ह्यातील सर्व पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते.
या कार्यशाळे दरम्यान राहुल गवई उपवनसंरक्षक भंडारा यांनी वन्यप्राणी बचाव कार्यात उत्तम कामगिरी केलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी तसेच वन कर्मचारी यांना प्रशस्तीपत्राद्वारे सन्मानित केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक सचिन निलख सहाय्यक वनसंरक्षक भंडारा तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वनरक्षक सचिन कुकडे यांनी व्यक्त केले.