महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीवर
दोन अशासकीय महिला सदस्यांची नियुक्तीकरीता प्रस्ताव आमंत्रित
गडचिरोली,दि.३: महिला व बाल विकास विभागाकडुन महिलांकरीता सामाजिक कायदे व महिला धोरणच्या अंमलबजावणीकरीता तसेच महिलांच्या विकासाकरीता विविध योजना राबविण्याच्या/ अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, यांचे अध्यक्षतेखाली अनेक समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. सदर समित्यांचे एकत्रीकरण करुन शासननिर्णय, दिनांक ०५ मार्च २०२४ अन्वये संपुर्ण जिल्हा स्तरावर संपुर्ण अंमलबजावणी करण्याकरीता जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीवर दोन अशासकीय सदस्य महिलांची नियुक्ती करायचे आहे. यासाठी सामाजिक क्षेत्रात महिलासाठी कार्य करणाऱ्या, महिला धोरण, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रात कमीतकमी 5 वर्षाचा अनुभव असणाऱ्या गडचिरोली जिल्हयातील महिलांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. सदरचे प्रस्ताव दिनांक 13 डिसेंबर 2024 पर्यत कार्यालयीन वेळेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, शासकीय संकुल बॅरेक क्रमांक 1, खोली क्र 25 गडचिरोली येथे सादर करावेत. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे.