जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे संपन्न

जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे संपन्न

भंडारा, दि. 3 : जागतिक एड्स दिनानिमीत्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचनानुसार 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हयात करण्यात येणार आहे. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी जिल्हा रुग्णालय भंडाराद्वारे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या विभागाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिपचंद सोयाम व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बिजु गवारे,व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा नोडल अधिकारी,डॉ.अतुलकुमार टेभुर्णे,यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव बिजु गवारे,यांनी एका दिवसापुरता हा दिवस मर्यादित न ठेवता सातत्याने सामान्य जनतेत एड्स बाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिपचंद सोयाम यांनीही आपले विचार व्यक्त केले. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मनोज येरणे, यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या रॅलीत विविध महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने सहभागी झालेहोते.