नक्षल सप्ताह दरम्यान जहाल महिला माओवाद्याने केले आत्मसमर्पण
शासनाने जाहिर केले होते एकुण ०२ लाख रूपयांचे बक्षिस.
शासनाने सन २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६७९ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक ०२ डिसेंबर २०२४ रोजी जहाल महिला माओवादी नामे तारा ऊर्फ शारदा ऊर्फ ज्योती दस्सा कुळमेथे, वय २८ वर्ष, रा. नैनेर, ता. अहेरी, जि. गडचिरोली हिने नक्षल सप्ताह दरम्यान गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्याबाबत माहिती
• तारा ऊर्फ शारदा ऊर्फ ज्योती दस्सा कुळमेथे
> दलममधील कार्यकाळ
सन २०१६ मध्ये अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २०१८ पर्यंत कार्यरत होती.
सन २०१८ पासून आजपर्यंत भामरागड दलममध्ये कार्यरत होती.
> कार्यकाळात केलेले गुन्हे
चकमक-०८
सन-२०१६ मध्ये कवठाराम जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग सन-२०१७ मध्ये शेडा-किष्टापुर जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष
सहभाग
सन-२०१७ मध्ये आशा-नैनेर जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग
सन २०१९ मध्ये मोरमेट्टा जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग. सन २०२० मध्ये आलदंडी जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
सन २०२० मध्ये येरदळमी जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
सन २०२१ मध्ये काकुर माड एरिया (छ.ग.) जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
सन-२०२३ मध्ये हिक्केर जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग
खून-०३
• सन २०२१ मध्ये मौजा कोठी येथील एका निरपराध इसमाच्या खुनामध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
• सन २०२३ मध्ये मिळदापल्ली येथील एका निरपराध इसमाच्या खुनामध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.