आपत्ती निवारण कक्षाद्वारे रील /व्हिडिओ स्पर्धेचे आयोजन
भंडारा,दि.29 : भंडारा जिल्हयात वर्षभरात उद्भभवणाऱ्या विविध आपतीचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) सक्षमपणे विविध पाऊले उचलते याचाच एक भाग म्हणून नागरिकांपर्यत खात्रीशीर व अद्यावत माहिती पोहचविण्यासाठी (DDMA भंडारा आपदा साथी प्रणाली यशस्वीपणे राबवत आहे. यामार्फत जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापनासंबंधीच्या अद्या वत माहितीच्या प्रसारामुळे नागरिकांना आपतीची पूर्वकल्पना मिळत असून नागरीकांना सुरक्षीत स्थळी स्थलांतरण करण्यास मदत होत आहे.तसेच संभाव्य जिवित व वित्तहानी टाळणे शक्य झाले आहे. दिनांक १७ जुलै,२०२४ ते 8 ऑगस्ट, 2024 दरम्यान भंडारा जिल्हयात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमध्ये साधारण 38,950 वेळा नागरीकानी सदर प्रणालीचा वापर केला आपदा साथी आपत्ती व्यवस्थापन chatbot ला मिळत असलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबददल DOMA,भंडारा समस्त भंडारा जिल्हयातील नागरिकांचा आभारी आहे. या यशस्वी वाटचालीला पुढे नेत DOMA,भंडारा महसूल पंधरवड्याचे औचित्य साधून chatbot सोबतच आपल्या सेवेसाठी आणि सहभागासाठी नव्याने घेऊन येत आहे आपदा साथी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स.
आपदा साथीच्या Facebook lnstagram X आणि Youtube प्लॅटफॉर्म्स द्ववारे नागरिकांना अद्यावत व खात्रीशीर माहिती,आपत्तीविषयक घडामोडी, प्रशासकीय सूचना,भारतीय हवामान विभागाकडून देण्यात येणार ईशारा व संदेश,शेती, आरोग्य,आणि आपत्तीविषयी तत्सम, माहिती उपलब्ध करुन देणे आणि जनजागृती करण्याचा मानस आहे.सदर माहिती अधिकृत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम अथवा अफवा दूर करण्यासाठी आणि आपत्ती काळातीलची बचत करत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी सदर डिजिटल माध्यम महत्वपूर्ण राहील.
आपत्ती व्यवस्थापनात प्रशासनासोबतच नागरिकांच्या सहभागाचे महत्व लक्षात घेऊन,तसेच सोशल मिडिया आणि मोबाईल तंत्रज्ञानाच्या पुरेपूर वापरातून आपत्तीचा प्रभाव व जनजागृतीचा अभाव कमी करण्याच्या नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपदा साथी या डिजिटल प्लॅटफॉर्म्स.वर DDMA भंडारा नागरिकांसाठी आपत्ती व्यवस्थापन-डिजिटल जागरुकता स्पर्धा आयोजित करत आहे.
या स्पर्धेअंतर्गत आपत्ती व्यवस्थापन जन जागरुकतेच्या संबंधित डिजिटल पोस्ट/फ्लायर,रील आणि व्हिडिओ बनवून जास्तीत जास्त नागरिकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे,यासंबधी सर्व माहिती नव्याने तयार केलेल्या आपदा साथी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स.द्वारे नागरिकांना वेळोवेळी उपलब्ध होईल.या स्पर्धेतील विजेत्यांना दिमाखदार कार्यक्रमात रोख स्वरुपातील पारितोषिकांने सन्मानित करण्यात येईल.याखेरीज,जिल्हयातील आपत्ती व्यवस्थापन संबंधित माहितीशी संलग्न राहण्यासाठी नागरिकांनी मोठया संख्येने आपदा साथी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्स.ला FOLLOWआणि SUBSCRIBE करुन या उपक्रमात सक्रिय सहभाग व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.