आदर्श, दिव्यांग, सखी व युथ मतदान केंद्रात सजावटीने मतदार भारावले

आदर्श, दिव्यांग, सखी व युथ मतदान केंद्रात सजावटीने मतदार भारावले

गडचिरोली विधानसभा मतदारसंघ :उत्साहाने केले मतदान

गडचिरोली,दि.21: ६८-गडचिरोली(अ.ज.) मतदारसंघात प्रत्येकी एक असे आदर्श मतदान केंद्र,दिव्यांग मतदान केंद्र , सखी(महिला) मतदान केंद्र व युथ मतदान केंद्र यावेळी स्थापन करण्यात आले होते. या मतदान केंद्राच्या मुख्य प्रवेश द्वारापासून ते मतदान कक्षापर्यंत आकर्षक व उत्कृष्ट सजावट केली होती. या सजावटीमुळे मतदार भारावले. मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांने आनंदाने व उत्साहाने मतदान केले.

गडचिरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेतील खोली क्रमांक १ मध्ये आदर्श मतदान केंद्र (मतदान केंद्र क्रमांक १२२) स्थापना केले होते. यामध्ये एकूण ८२६ मतदारांपैकी ४४१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

धानोरा रोडवरील शिवाजी महाविद्यालय मध्ये खोली क्रमांक १ मध्ये दिव्यांग मतदान कर्मचाऱ्यांद्वारे संचलित दिव्यांग मतदान केंद्र (मतदान केंद्र क्रमांक ९२)स्थापना केले होते.यामध्ये एकूण ७२८ मतदारांपैकी ४८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

गडचिरोली येथील पंचायत समिती कार्यालयातील बचत भवन मध्ये महिला मतदान कर्मचाऱ्यांद्वारे संचलित सखी(पिंक बूथ) मतदान केंद्र (मतदान केंद्र क्रमांक ८८)स्थापना केले होते.यामध्ये एकूण ५७० मतदारांपैकी ३२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील खोली क्रमांक ४ मध्ये युवा मतदान कर्मचाऱ्यांद्वारे संचलित युथ मतदान केंद्र(मतदान केंद्र क्रमांक २२३) स्थापना करण्यात आली होती. यामध्ये एकूण १ हजार १५९ मतदारांपैकी ७२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.