पोलीस म्हणुन बतावणी करणारे स्कॅम कॉल पासून सावध रहा

पोलीस म्हणुन बतावणी करणारे स्कॅम कॉल पासून सावध रहा

नुकतेच असे निदर्शनास आले आहे की, काही सराफा व्यवसायीकांना त्यांचे खाजगी मोबाईल क्रमांकवर इतर राज्यातील पोलीस असल्याचे (डीपी वर पोलीस फोटो असणारे) स्कॅम कॉल येत असुन त्यांच्या कडुन विविध कारणे व अटकेची भिती दाखवुन पैश्याची मागणी करीत आहेत.

तरी, सर्व सराफा व्यवसायीकांना कळविण्यांत येते की, इतर राज्यातील पोलीस हे स्थानिक पोलीसांच्या मदतीशिवाय कोणालाही अटक करु शकत नाही, त्यामुळे अश्या इतर राज्यातील पोलीस असल्याचे, किंवा सीबीआय अधिकारी, ईडी अधिकारी म्हणुन कोणी कॉल करीत असेल आणि व्हिडीओ कॉल करण्यास आग्रह करीत असेल तर अशा कॉल पासुन सावध रहावे हा एक नविन सायबर फॉडचा प्रकार असुन यास बळी पळु नका.

अश्या प्रकारचे धमकी, पैश्याची मागणी व ब्लॅकमेलींग चे कॉल आल्यास, तात्काळ http://cybercrime.gov.in या संकेतस्थळावरील Report and Check Suspect यावर तात्काळ रिपोर्ट करावा किंवा १९३० वर कॉल करुन सायबर गुन्हयाची तक्रार करा. य खलनिगरा