महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे आवाहन: लाभांसाठी दलालांच्या आमिषाला बळी पडू नका

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे आवाहन: लाभांसाठी दलालांच्या आमिषाला बळी पडू नका

 दि. 8 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनांचे लाभ संगणकीकृत प्रणालीद्वारे (ऑनलाईन) अर्ज केल्यावर मिळतात. या प्रक्रियेत अर्जदारांचे कागदपत्रांची छाननी करून तपासणी केली जाते आणि त्यानंतर लाभ थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

तथापि, काही खाजगी व्यक्ती या सेवेसाठी कामगारांकडून पैसे वसूल करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर, मंडळाने सर्व बांधकाम कामगारांना आवाहन केले आहे की, कोणत्याही दलालांच्या आमिषाला बळी पडू नये किंवा दबावाखाली पैसे देऊ नयेत.

जर असे प्रकार आपल्या निदर्शनास आले, तर तातडीने जवळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा जिल्हा कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे मंडळाने आवाहन केले आहे.