मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
प्रशिक्षणार्थी पदाकरीता 1733 उमेदवारांचे अर्ज प्राप्त
भंडारा दि. 8 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण -2024/प्र.क्र.90/व्यशि-3, दि. 09/07/2024 अन्वये शासनाने सन 2024-25 पासून “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” राबविण्यास मान्यता दिलेली आहे. उमेदवारांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे हा या योजनेचा उददेश आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्योजकांना आवश्यक असणारे मनूष्यबळ कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) द्वारे 6 महिन्यांच्या कालावधीकरीता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार (बारावी-रू.6000/-,आयटीआय/डिप्लोमा-रू.8000/-,पदवी/पदव्यूत्तर-10000/-) दरमहा विद्यावेतन शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने (DBT) अदा करण्यात येईल.
त्याअनूषंगाने, जिल्हयात दिनांक 20/09/2024 ते 30/09/2024 या कालावधीत तालूकानिहाय एकूण 14 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मेळावे घेण्यात आलेले आहेत. सदर मेळाव्यात एकूण 83 शासकीय/खाजगी उद्योजक सहभागी झाले होते तर सदर मेळाव्याकरीता एकूण 1391 उमेदवारांनी सहभाग नोंदवला होता त्यापैकी 257 उमेदवारांची जागेवर निवड करण्यात आली.
सदर रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा कार्यालयातील डॉ.सुधाकर झळके, सहायक आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली भाऊराव निंबार्ते क.कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, सोनु उके जिल्हा कौशल्य विकास समन्वयक, श.क.सय्यद वरिष्ठ लिपीक, आशालता वालदे वरिष्ठ लिपीक, प्रिया माकोडे वरिष्ठ लिपीक, सुहास बोंदरे जिल्हा समन्वयक, अतूल पडोळे जिल्हा समन्वयक, नाजमा पठाण जिल्हा समन्वयक, राज पारधी प्रशिक्षणार्थी, आय.जी.माटूरकर शिपाई तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच संबंधित खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था/महाविद्यालय/कार्यालय येथील कर्मचारी वृंद आदींनी अथक परीश्रम घेतले.