जिल्हास्तरीय शालेय बुडो स्पर्धाचे आयोजन

जिल्हास्तरीय शालेय बुडो स्पर्धाचे आयोजन

गडचिरोली, दि.07: क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बुडो स्पर्धेचे आयोजन नमुद अटी व शर्तीच्या अधीन राहून गडचिरोली जिल्हा बुडो संघटनेच्या संपूर्णपणे तांत्रिक व आर्थिक जबाबदारीने दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा, आष्टी येथे करण्यात येत आहे.
तरी गडचिरोली जिल्ह्यातील सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इच्छुक शैक्षणिक संस्था/ खेळाडूंनी दिनांक 11 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा, आष्टी ता. चामोर्शी येथे आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे. सदर स्पर्धेविषयी आवश्यक माहिती करीता कपील मसराम यांचेशी 7020222472 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जिल्हास्तर बुडो स्पर्धेत सहभागी होण्यापुर्वी आपला प्रवेश फी चा भरणा करुन घ्यावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.