भेंडी पिकातील उत्तम कृषि पद्धतीबाबत विभागस्तरीय कार्यशाळेचे आयोजन
भंडारा,दि.07 : ग्राहकांना आरोग्यदायी आणि सुरक्षित अन्न पुरविण्यासाठी शेतीत काही संहिता.मानके आणि नियम पाळणे आवश्यक असते या प्रघतीचा अवलंब केल्याने शाश्वत उत्पादन सुनिश्चित होते. पर्यावरण संरक्षण होते. याच चांगल्या उत्तम कृषि प्रघतीबाबत शेतकऱ्या मध्ये जनजागृती घडवून आणणेकरीता 8 ऑक्टोबर, 2024 रोजी भंडारा येथे भेंडी पिकातील उत्तम कृषि पध्दतीबाबत विभागस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सहकारी व पणन विभाग आशियायी विकास बॅक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प मॅग्नेट अंतर्गत महाराष्ट्र सरकार सहकार विकास महामंडळ,पुणे व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा भडारा यांच्या संयुक्त विदयमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे सदर प्रशिक्षण कार्यक्रमात भेंडी पिकातील उत्तम कृषि पध्दती.भाजी पिकांसाठी कृषि विभागाच्या विविध योजना भेंडी पिकातील काढणीपश्चचात तंत्रज्ञान इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यास येणार आहे.
तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा यांनी केले आहे.