माझी वसुंधरा अभियानात सिंदेवाही –लोणवाही नगरपंचायत जिल्ह्यात प्रथम
माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत सिंदेवाही –लोणवाही नगरपंचायत विविध उपक्रम राबवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला.५० लाख रुपयांचे बक्षीस नगरपंचायतला मिळणार आहे.पृथ्वी, वायु, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा अभिवान’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ हे १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानाबाबत मुख्याधिकारी राहुल कंकाळ यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबविण्यात आले. यावर्षी ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’ मोहीम हाती घेण्यात आली. विद्यार्थ्यांना पर्यावरण समजावे यासाठी पर्यावरण सेवा योजना राबविण्यात आली. रॅली, कार्यशाळा, व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण, पर्यावरण सेवा योजना अंतर्गत शाळेंचा सहभाग , मॅरेथॉन, स्वच्छता नगरपंचायतने रॅली व सायकल रॅली घेण्यात आली. त्याचेच यश म्हणून हा पुरस्कार मिळाला आहे, अभियानाच्या यशस्वितेसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख, स्वच्छता लिपिक विनोद काटकर , शहर समन्वयक संदीप कांबळे, स्वच्छता कर्मचारी दिलेश सहारे व पवन पेटकर ,रोशन सांडेकर सहकार्य केले. या अभियानात नगरपंचायतने सुरेख काम केले असून पुढील वर्षी आम्ही राज्यातून क्रमांक मिळविण्यासाठी मेहनत घेऊ, असे मत मुख्याधिकारी राहुल कंकाळ यांनी व्यक्त केले.