सिंदेवाही –लोणवाही नगरपंचायत अंतर्गत स्वच्छता सुरक्षा व आरोग्य शिबीर
स्वच्छता ही सेवा 2024 मोहिमेंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता’ या थीममध्ये सिंदेवाही –लोणवाही नगरपंचायततर्फे स्वच्छता मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात स्वच्छता कामगारांना पहिल्या सत्रात ग्रामीण रुग्णालय तथा मुख्याधिकारी राहुल कंकाळ द्वारे मानसिक आरोग्य कसे सुदृढ राहावे, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये त्यांनी मोबाइलचे, अतिविचार करण्याचे मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम सांगितले. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालतर्फे शारीरिक आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये सफाई कामगारांचा रक्तदाब, शुगर, ताप, खोकला आदी आजारांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तपासणीदरम्यान स्वच्छता सुरक्षा शिबिराचे महत्त्वसुद्धा कामगारांना समजावण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता निरीक्षक अनिकेत मानकर ,शहर समन्वयक संदीप कांबळे ,लिपिक विनोद काटकर, यांनी सहकार्य केले.