जिज्ञासा फाऊंडेशन तर्फे सिंदेवाही येथे समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम
जिज्ञासा फाऊंडेशन चंद्रपूर तर्फे शिवशक्ती भीमशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच दिनांक ५ ऑगस्ट २०२४ ला स्थानिक सोमेश्वर महाराज मंदिरच्या प्रांगणात महाराष्ट्राचा बुलंद आवाज तसेच सुप्रसिद्ध गायक माननीय विकास राजा व त्यांचा संच नागपूर यांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला. यात त्यांनी विद्वत्तेचा महामेरू, ज्ञायीयाचा दीपस्तंभ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवीत कारकिर्दीवर आपल्या प्रबोधनपर गीतातून प्रकाश टाकला. त्यांनी सदर गीतातून छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली समाजप्रिय उल्लेखनीय कामगिरी याचा आविष्कार घडवून आणला. या प्रसंगी उपयोजित कार्यक्रमास सिंदेवाही तालुक्याचे तहसीलदार संदीप पानमंद, नगराध्यक्ष भास्कर नंनावर, गणेसभाऊ मेश्राम, नगरसेवक दिलीप रामटेके, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कामतवार उपाध्यक्ष मिथुन मेश्राम,अमान कुरेशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे निमित्ताने सामाजिक कार्यात व पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा जिज्ञासा फाऊंडेशन तर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिज्ञासा फाऊंडेशनचे आयोजक राकेश अलोणे, सचिन रामटेके, सुनिल गेडाम, तेजेंद्र. नागदेवते, धनंजय साखरे, व समस्त जिज्ञासा फाऊंडेशनचे व भीम आर्मी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच हजारो अशा संख्येने बंधू भगिनी उपस्थित होते.