विद्यार्थ्यांना घडवणे हे शिक्षकांचे ईश्वरीय कार्य : दिनेश चोखारे

विद्यार्थ्यांना घडवणे हे शिक्षकांचे ईश्वरीय कार्य : दिनेश चोखारे

शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकाचा भद्रावती तालुक्यातील मुरसा, घोनाड, कोची, पिपरी येथील शाळेत जाऊन शिक्षकांचा सत्कार

शिक्षकांचे वक्तीमत्व जेवढे प्रभावी, परिणामकारक, ज्ञान समृद्ध असेल तेवढे ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते. आजची आव्हाने आणि भविष्यातील समस्या यांना सामारे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे हे शिक्षकांनी आपले ध्येय समजून काम सुरु केले असून त्याचे हे कार्य  विद्यार्थ्यांना घडवणारे आहे. शिक्षकांचे हे कार्य ईश्वरीय कार्य असल्याचे मत जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांनी सांगितले .

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक, जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाचे कौतुक करण्यासाठी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकाचा सत्कार सप्ताह सुरु केला असुन निमित्ताने वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांचा सत्कार त्यांच्या शाळेत जाऊन शुक्रवार  दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आला.  यावेळी भद्रावती तालुक्यातील मुरसा, घोनाड, कोची, पिपरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा सहभाग असून येथील मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे मूरसा ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता जमदाडे, घोनाड चे सरपंच महेंद्र भोयर, दिलीप मत्ते, विजय मत्ते, अरुण शेरकी,  गजानन भोयर, प्रमोद वरारकर, मालेकर पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

पुढे बोलतांना ते म्हणाले कि, आपल्या शाळांमधून परिक्षार्थी तयार करण्यापेक्षा खरे ज्ञानाकांक्षी, विवेकनिष्ठ प्रयोगवीर तयार होण्यासाठी प्रत्येक शाळा ही साक्षात प्रयोगशाळा झाली पाहिजे. शिक्षकांनी आपल्या वाट्याला आलेले काम कुशलतेने, आनंदीवृत्तीने करायला हवे. बुद्धीवादी शक्ती या भूमिकेतून प्रत्येक शिक्षकाने नवनवीन अध्यापन तंत्राचा अवलंब करून विषयात सहजता आणावी. त्या त्या विषयाचा प्रत्यक्ष जीवनाशी असणारा संबंध स्पष्ट करावा आणि शिक्षण हे खऱ्या अर्थाने जीवन शिक्षण बनवने गरजेचे आहे.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरसा येथे मुख्याध्यापक उपेंद्र दमके सर, शिक्षक रमेश वाकडे  सर, संतोष निकुंबे सर , शिक्षिका समिता घाटे मॅडम ज्योती पारखी, यांची तर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घोनाड येथे मुख्याध्यपक भास्कर वाढरे सर, शिक्षिका त्रिरत्ना चांदेकर मॅडम, शिक्षिका कल्याणी बोडे मॅडम,

शिक्षिका नंदा महाजन मॅडम, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा  कोची येथे मुख्याध्यपक शंकर नळे सर, शिक्षिका माधुरी चिंचोलकर मॅडम, तर

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिपरी येथे मुख्याध्यपक संजय मासळकर सर,  शिक्षक सुभाष लांजेकर सर , शिक्षक अनिल भगत सर , शिक्षक शशिकांत रामटेके सर,  शिक्षिका साधना उपगन्लावार मॅडम, यांची उपस्थिती होती.

यावेळी भद्रावती तालुक्यातील मुरसा, घोनाड, कोची, पिपरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका व शिक्षक, शिक्षिकांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी गावातील नागरीक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.