भंडारा येथे पेंशन अदालत संपन्न

भंडारा येथे पेंशन अदालत संपन्न

भंडारा दि. 4 : जिल्हा कोषागार कार्यालय, भंडारा व महालेखापाल कार्यालय, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक03/10/2024 रोजी सामाजिक न्याय भवन, भंडारा येथे पेंशन अदालतीचे आयोजन करण्यांत आले होते.

सदर पेंशन अदालतीस विविध विभागांचे अधिकारी/कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक उपस्थित होते. सदरकार्यक्रमास महालेखापाल कार्यालय, नागपूर येथील राजेश सांगोळे, वरिष्ठ लेखा अधिकारी, एस. एम. देशपांडे, सहाय्यक लेखा अधिकारी व एस. बी. गुल्हाणे, वरिष्ठ लेखापाल हे उपस्थित होते.

पेंशन अदालतीचे दरम्यान महालेखापाल कार्यालयास पेंशन प्रकरणे सादर करतांना कोणती काळजी घ्यावी तसेच सदर प्रकरणासोबत कुठले आवश्यक ते दस्तावेज सादर करावेत याबाबत एस. एम. देशपांडे, सहाय्यक लेखा अधिकारी यांनी सखोल माहिती दिली. निवृत्तीवेतन प्रकरणे आक्षेपात परत येण्याची कारणे यावर सांगोळे, वरिष्ठ लेखा अधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे निवृत्तीवेतनधारक तसेच अधिकारी/कर्मचारी यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान महालेखापाल कार्यालयाचे चमुने अत्यंत यशस्वीरित्या केले.

सदर पेंशन अदालतीस जिल्हा कोषागार कार्यालय, भंडाराचे वतीने एम. आर. डोरले, जिल्हा कोषागार अधिकारी, प्र. पु. पत्की, अप्पर कोषागार अधिकारी, एस. एस. ईश्वरकर, अप्पर कोषागार अधिकारी तसेच सचिन मिलमिले, अप्पर कोषागार अधिकारी हे मंचावर उपस्थित होते.