पी एम किसान योजनेचा अर्ज भरण्यासाठी सूचना
भंडारा दि. 3 : शेतकऱ्यांना निश्चीत उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. योजनेअंतर्गत प्रति शेतकरी कुटुंबाला प्रति वर्षी 6000 रु. इतके अर्थसहाय्य तीन टप्प्यात शासन निर्णयाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहुन उपलब्ध करुन देण्यात येतात..
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय व तालुका कृषि अधिकारी कार्यालय स्तरावर पी. एम. किसान पोर्टलवर केलेल्या अर्जाची तपासणी करताना असे आढळुन आले आहे की, अर्जदाराद्वारे योजनेअंतर्गत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे ऑनलाईन प्रणालीवर अपलोड केले जात नाही.
करीता पी. एम. किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत” स्वयंनोदणीकृत लाभार्थी यांना सुचित करण्यात येते की, कृषि आयुक्तालय, पुणे यांचे आदेशान्वये स्वयंनोंदणीकृत लाभार्थीनी पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणी करताना खालील कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत (कागदपत्रे २०० kb मर्यादेतच अपलोड करावीत.)
१) 7/12 व 8अ (खातेउतारा)
२) फेरफार नोंद (आपले नाव व दिनांक असलेली ऑनलाईन किंवा रेकॉर्ड रुममध्ये उपलब्ध)
३) जर जमीन दि. 01/02/2019 नंतर वारसाने नावावर आली असेल तर ज्यांचे नावावरुन वारसाने आली असेल त्यांचे फेरफार नोंद
४) आधार कार्ड (पती-पत्नी यांचे एकाच पानावर स्कॅन करावे.)
५) जर सात-बारा व आधार कार्ड यावर नाव वेगळे असेल तर राजपत्र (Affidavit)
वरील कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रत व वरील नमुद केलेल्या कागदपत्रांचा संच तयार करुन आपल्या गावातील संबंधित कृषि सहाय्यक यांचेकडे जमा करावा.
असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा श्रीमती संगिता माने यांनी केलेले आहे.