वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा

गडचिरोली, दि.01: राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार 2 ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 11.50 वा. गडचिरोली हेलिपॅड येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापना दिन व दीक्षांत समारंभास गोंडवाना विद्यापीठ येथे उपस्थिती. दुपारी 01 ते 01.45 वा. राखीव. दुपारी 01.45 ते 04.30 वा. राज्यपाल यांच्यासमवेत विविध संघटना व संस्था यांच्या भेटी प्रसंगी शासकिय विश्रामगृह येथे उपस्थिती. सायं. 04.45 वा. गडचिरोली येथून चंद्रपूरकडे प्रयाण.