जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक, शासकीय सेवा व विविध योजनांचा महामेळावा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने

कायदेविषयक, शासकीय सेवा व विविध योजनांचा महामेळावा

भंडारा,दि.29 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा व जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 29 सप्टेंबर, 2024 रोजी मातोश्री सभागृह, तुमसर प्रांगणात कायदेविषयक, शासकीय सेवा व विविध योजनांचा महामेळावा आणि अमलबजावणी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले.

मार्गदर्शन करताना माननीय न्यायमुर्ती ‘श्री.अनिल पानसरे म्हणाल्या,दिवसेंदिवस महिलांच्या वाढत्या समस्या व प्रगल्भ कायदे यामुळे प्रत्येक महिलेला तिच्या न्याय मागण्यांसाठी कायदेविषयक अधिकारांची जाणीव करून घेणे आवश्यक आहे.”न्याय सर्वांसाठी” हे विधी सेवा प्राधिकरणाचे घोषवाक्य आहे. भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळण्याचे अधिकार प्राप्त होतात. राज्य घटनेच्या आर्टिकल १४ अनुसार सर्व नागरिकांना समान संधी दिली आहे.

तसेच घटनेच्या आर्टिकल ३९ अनुसार समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायेदविषयक सहाय्य देण्याची जबाबदारी शासनाची आहे. न्यायालयीन पक्रियेमध्ये न्याय मागण्यांसाठी सर्वांना समान संधी प्राप्त करून देणे जेणेकरून समाजातील कोणतीही व्यक्ती किंवा घटक न्यायापासून वंचित रहाणार नाही हे या कायदेविषयक कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचेही माननीय न्यायमुर्ती ‘श्री.अनिल पानसरे म्हणाल्या.

शासनाच्या विविध महिलांविषयक योजना तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे अॕसिड हल्ल्याच्या पिडीतांबाबत योजना २०१६, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक योजना २०१६ व बालकांविषयीच्या मोफत शैक्षणिक योजना याबाबत माहिती दिली.

सदर कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, कृषी विभाग, आरोग्य विभाग, कामगार कार्यालय, उप प्रादेशीक परिवहन, पंचायत समिती, अपंग महामंडळ, तहसील कार्यालय, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र ई विविध शासकीय कार्यालयामार्फत जनतेला विविध योजनांची माहिती देण्याच्या दृष्टीने स्टॉल लावण्यात आले होते. असे एकूण 40 स्टॉल लावण्यात आले होते.

शिबीराची सुरुवात सकाळी 10.30 वाजता व्यासपीठावर उपस्थित मानयवरांना रोपटे देवून करण्यात आले. माननीय न्यायमुर्ती ‘श्री.अनिल पानसरे मुंबई उच न्यायालय, खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायमुर्ती न्यायिक जिहा भंडारा याचे हस्ते व मा. राजेश अस्मर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा दक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा याचे अध्यक्षतेखाली दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले,

यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. संजय कोलत, जिल्हाधिकारी, अपर पोलीस अधिक्षक, कातकाडे  समीर कुर्तकोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. न्यायाधीश सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जे. आर. घाडगे, दिवाणी न्यायाधीश क स्तर, तुमसर, व्ही. आर. माटे, तसेच भडारा जिल्हयातील सर्व  न्यायीक अधिकारी, जिल्हा वकील संघ, भंडाराचे अधिवक्ता, जिल्हा प्रशासनातील सर्व कार्यालयांचे प्रमुख तसेच न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणायांनी प्रत्येक नागरिकाचा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा  असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक बिजु बा. गधारे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा यांनी केलेल्यांनी विधी सेवा शिबिरांद्वारे नागरिकांचे समीकरण अभियान दिनांक 31 ऑक्टोबर पासून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच, तालुका विधी सेवा समिती तसेच शासकीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सामान्य नागरिकांना कायदेविषयक तसेच त्याचे हक्काबाबत जाणीव करून अभियानाचा उद्देश सांगितले,