28 सप्टेंबर पासून गडचिरोली जिल्हात कलम 37 लागू

28 सप्टेंबर पासून गडचिरोली जिल्हात कलम 37 लागू

गडचिरोली,  दि. 27: गडचिरोली जिल्हयात दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी पासुन ते 01 ऑक्टोबर 0204 रोजी पर्यंत मसक-या गणेशोत्सव, दिनांक 03 ऑक्टोबर 2024 ते दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी नवरात्र उत्सव आणी दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी विजयादशमी दसरा उत्सव जिल्हयात साजरा करण्यात येणार आहेत. तसेच काही विविध राजकीय पक्ष, संघटना व नागरिक हे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा, मिरवणुक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घड्डु नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात दिनांक २८/०९/२०२४ चे ००.०१ वा. ते दिनांक १२/१०/२०२४ चे २४.०० वाजे पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) लागू होणेस विनंती केलेली आहे. त्याअर्थी, सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे.

1. कोणतीही व्यक्ती दिनांक २८/०९/२०२४ चे ००.०१ वा. ते दिनांक १२/१०/२०२४ चे २४.०० वाजे पर्यंत खालील कृत्य

करणार नाही.

अ) शख, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे.

ब) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.

क) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधणे बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे.

ङ) व्यक्तीच्या किंवा प्रेताच्या किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे.

ई) जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणने, वाद्ये वाजविणे.

फ) ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितात धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा जनतेत प्रसार करणे.

२. उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी अथवा संबंधीत पोलीस स्टेशन अधिकारी (जे शक्य असेल ते) यांचे पूर्व परवानगी शिवाय कोणीही सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणूक काढू नये, पाच इसम किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत, सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर दिनांक २८/०९/२०२४ चे ००.०१ वा. ते दिनांक १२/१०/२०२४ चे २४.०० वाजे पावेतो जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. सदर आदेश दिनांक २८/०९/२०२४ चे ००.०१ वा. ते दिनांक १२/१०/२०२४ चे २४.०० वाजे पावेतो संपूर्ण गडचिरोली जिल्हयाच्या क्षेत्राकरीता लागू राहतील.

३. अ) सदर आदेशाच्या प्रती उपविभागीय दंडाधिकारी, गडचिरोली/चामोर्शी/देसाईगंज/कुरखेडा/ एटापल्ली/ अहेरी, कार्यकारी दंडाधिकारी (सर्व), संवर्ग विकास अधिकारी (सर्व), नगर परिषद/नगर पंचायत (सर्व), पोलीस स्टेशन अधिकारी (सर्व) यांचे नोटीस बोर्डावर लावून प्रसिध्द करावे.

ब) सदर आदेश सहज दिसण्याजोग्या जागी लावावा.

क) सदर आदेशास मुनादी व्दारे, ध्वनीक्षेपणा व्दारे, नगारा वाजवून प्रसिध्दी देण्यात यावी.

सदर आदेश कर्तव्यावरील शासकीय कर्मचारी यांना लागू होणार नाही.

सदर आदेशाची कलम २ प्रेतयात्रा, धार्मिक समारंभ व लग्न कार्याकरीता लागू होणार नाही.

असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली संजय देने यांनी कळविले आहे.