निवासी शाळेतील विद्यार्थिनींचे कॅरम स्पर्धेत यश 

निवासी शाळेतील विद्यार्थिनींचे कॅरम स्पर्धेत यश 

भंडारा दि27 : समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळेमधील विद्यार्थ्यांनी कॅरम स्पर्धेमध्ये यश मिळवले आहे. विभागीय पातळीवरील कॅरम स्पर्धेत निवासी शाळा राजे दहेगाव भंडारा येथील वय वर्ष 14 वयोगटात विद्यार्थिनी कु. नव्या देशपांडे आणि कु. सिमरन सोनटक्के यांनी विजय प्राप्त करून राज्यस्तरा वरिल स्पर्धेत सहभाग निश्चित केला आहे.

या यशाबद्दल सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी संबंधित विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी राज्यस्तरावर देखील यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.