कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ई – के वाय सी करावे
राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. 1000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.5,000 (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य द्यावयाचे आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर कापूस सोयाबीन ची नोंद आहे, वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संघनकीकरण झाले नाही, अश्या गावातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे.
सदरचे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा करण्यात
येणार आहे. या साठी सर्वसाधारण 96 लाख खातेदार पैकी 68 लाख खातेदार यांनी आपले आधार संमती दिली
आहे . या पैकी नमो शेतकरी महासंम्मान निधी योजनेत 46.68 लाख आधार क्रमांक जुळले आहेत. यांची e-kyc
करणेची आवश्यकता नाही. मात्र या व्यतिरिक्त राहिलेले 21.38 लाख खातेदार यांनी त्यांचे आधार e-kyc करणे
आवश्यक आहे. या पैकी 2.30 लाख खातेदार यांनी दिनांक 25/09/2024 अखेर e-kyc पूर्ण केले आहे.
त्वरित शिल्लक 19 लाख खातेदार यांचे करिता https://scagridbt.mahait.org/ या पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
- ज्या शेतक-यांचे ई-केवासी करावयाचे आहे, त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे.
सदरच्या शेतक-यांनी संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा. कृषि सहाय्यक त्यांचे login
मध्ये उपलब्ध सुविधेव्दारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांक वर येणाऱ्या
OTP च्या माध्यमातून e-kyc करतील.
- तसेच शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टल वर जाऊन OTP च्या माध्यमातून किंवा Biometric च्या
माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात (CSC) जावून सुद्धा e-kyc करु शकतात. याकरिता पोर्टलच्या
मुख्य पानावर Disbursement status येथे click केल्यानंतर शेतक-यांनी आपला आधार
क्रमांक टाकावा. नंतर मोबाईलवर प्राप्त OTP किंवा CSC केंद्रातील Biometric मशिनच्या
माध्यमातून ते e-kyc पूर्ण करु शकतात.
तरी शेतक-यांनी तात्काळ e-kyc करुन घ्यावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क साधावा.