श्रवण जागरूकतेसाठी रॅली आणि स्पर्धांचे आयोजन

सामान्य रुग्णालयात सांकेतिक भाषांचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा

श्रवण जागरूकतेसाठी रॅली आणि स्पर्धांचे आयोजन

भंडारा दि.26 नुकताच “सांकेतिक भाषांचा आंतरराष्ट्रीय दिवस”  दि. 23 ते दि. 29 सप्टेंबर2024 रोजी “बधिरत्व निर्मूलन आंतरराष्ट्रीय सप्ताह” जिल्हास्तरावर साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी दिनांक 23 सप्टेंबर रोजी “बधिरांचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करण्यात येतोयामध्ये कर्णबधिर लोकांना भेडसावणाऱ्या आव्हानाबद्दल जागरुकता निर्माण करणेत्यांचे हक्क ओळखणेसांकेतिक भाषेचे महत्व सांगणे आणि सर्व सामान्य लोकांमध्ये लवकर श्रवण कमी होणे हे शोधण्याची गरज आहे. ICMR ‌द्वारे 2020 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसारभारतातील सुमारे 9.9% लोकांमध्ये श्रवणशक्ती कमी झाली आहे. त्यापैकी 51.2% लोक 60 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील आहेत.

त्याकरीता दि. 23 ते दि. 29 सप्टेंबर2024 या कालावधीत “बधिरत्व निर्मूलन आंतरराष्ट्रीय सप्ताह” हा जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे येथील इ.एन.टी विभागात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम सर यांच्या अध्यक्षते खाली दिपप्रजवण करून राष्ट्रीय कर्णबाधितता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सांकेतिक भाषांचा आंतरराष्ट्रीय अधिकार‘ दिवस व सप्ताहाची सुरवात केली.

कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील आवारात श्रवण बाधित व्यक्तीच्या जागरूकते बाबत रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होतेतसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले होते. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सोयाम सर प्रमुख अतिथी तथा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अतूलकुमार टेंभुर्णे तसेच कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक शहारे व पाटीलडॉ. नगराळे (वर्ग-1) काननाकघसा तज्ञयांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला उपस्थित डॉ. उमरे मॅडम डॉक्टर अभिषेक हे होते.